मिलिंद एकबोटे ला कोणीही हात लावू शकत नाही.



पुणे :  मिलिंद रमाकांत एकबोटे राहणार. शिवाजीनगर पुणे हा कट्टर ब्राह्मणवादी असून तो बहुजन तरुणांना मुस्लीम व दलितांविरुद्ध भडकवून जातीय तणाव निर्माण करीत असतो. त्याचे हे उद्योग गेल्या तीस वर्षापासून सुरू आहेत. जातीय तणाव निर्माण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल त्याचे विरुद्ध 1998 पासून अनेक गुन्हे दाखल आहेत.

2001 साली पुणे शहर,पुणे ग्रामीण व सातारा येथे त्याच्या जातीवादी हालचाली फारच वाढल्यामुळे त्याचे विरुद्ध 'महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी वाले,औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती विरोधक अधिनियम 1981( सुधारण 1996) 'म्हणजेच एमपीडीए (MPDA) नुसार कारवाई करून त्याला स्थानबुद्ध (detain) करावे असा आव्हाल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पोलीस आयुक्त, पुणे यांना दिनांक 30/10/2001 रोजी पाठविला होता.


पोलीस आयुक्त पुणे यांनी मिलिंद एकबोटे विरुद्ध दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती मिळून त्याला MPDA नुसार स्थानबुद्ध करण्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला होता व त्यासंबंधी विधी सल्लागार यांचे कायदेशीर मत ही घेतले होते. तत्कालीन पोलिस आयुक्त यांनी दिनांक 2/11/2001 रोजी प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली होती. फक्त स्थानबुद्ध आदेशाच्या प्रती टाईप करून त्यावर पोलिस आयुक्तांची सही घेणे व एकबोटेला अटक करणे बाकी होते.पण त्याच काळात काही महत्त्वाच्या घटना घडल्या.

दिनांक.1/11/2001 रोजी पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे उद्घाटन तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे हस्ते होणार होते. त्यासाठी तत्कालीन उपपंतप्रधान एल.के.आडवाणी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे ही हजर राहणार होते.मिलिंद एकबोटेला MPDA खाली स्थानबद्ध करण्यात येणार ही माहिती स्थानिक RSS च्या नेत्यांना तोपर्यंत समजली होती.हा त्यांच्या दृष्टीने फार मोठा धक्का होता.म्हणून महाराष्ट्रातील प्रमुख RSS च्या नेत्यांनी दिनांक 1/11/2001 रोजी अटल बिहारी वाजपेयी व एल.के.अडवाणी यांची भेट घेऊन त्यांनी ही कारवाई न करण्याची शरद पवारांना विनंती करावी अशी गळ घातली. त्याप्रमाणे त्या दोघांनी शरद पवारांना सांगितले व शरद पवारांनी ब्राह्मणवादी आदेश शिरसावंद्य मानून महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस महासंचालक मल्होत्रा व तत्कालीन गुप्तचर विभाग प्रमुख पसरिचा यांना त्या प्रमाणे आदेश दिला. त्या दोघांनी दिनांक. 3/11/2001 रोजी पुण्याच्या पोलिस आयुक्त यांना मिलिंद एकबोटे विरुद्ध कारवाई न करण्याचा तोंडी आदेश दिला. त्यामुळे मिलिंद एकबोटेच्या स्थानबस्थेचा अंतिम आदेश पोलीस आयुक्त यांच्या सहीसाठी दिनांक. 3/11/2011 रोजी जेव्हा त्यांचे समोर आला तेव्हा त्यांनी सही केली नाही व "राज्यातील जातीवादी परिस्थितीचा विचार करता या कारवाईच्या ग्रामीण भागात प्रतिक्रिया उमटतील अशी शक्यता असल्याचे पोलीस महासंचालकांचे व गुप्तचर विभाग प्रमुखांचे मत आहे, तरी थोडे थांबू" अशी टिप्पणी मध्ये नोंद केली व आदेशावर स्वाक्षरी केली नाही. ही घटना राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असतानाची आहे.

त्यानंतर ही मिलिंद एकबोटेच्या जातीवादी कारवाया चालूच राहिल्या. नुकत्याच दिनांक.1/1/2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीला सुद्धा तो जबाबदार आहे. याप्रकरणी त्याने मराठा तरुणांना दलितांविरुद्ध भडकवून दंगल घडवून  आणल्याबद्दल  त्याचे विरुद्ध गुन्हा ही दाखल झालेला आहे. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिलिंद एकबोटेला पाठीशी घालत भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत क्लीनचिट दिली आहे

''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

दिनांक.3/3/2021 रोजी

पुन्हा मिलिंद एकबोटे यांनी समस्त कोंढवा येथे राहणाऱ्या सर्व समाज बांधवांचे मन दुखणारे वक्तव्य केले. कोंडवा हा मिनी पाकिस्तान आहे तेथे आतंकवाद्यांचे स्लीपर सेल आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेतो हज हाऊस होऊ देणार नाही. असे वक्तव्य करून पुन्हा त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काम केले आहे.  संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश भास्कर काळे यांनी कोंढवा पोलीस ठाणे येथे 5/3/2021 रोजी मिलिंद एकबोटे विरुद्ध तक्रार दाखल केली व पुणे कोंढवा पोलिसांनी

१५३,153-A,153-B,295-A,२८९,५००,५०१,५०२,५०५(१)(क),५०५(२),120-B,३४,६६(अ) 66(B)

प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.


#चला बघूया या प्रकरणांमध्ये तरी न्याय मिळेल का?

"''''''"""""""""""""""""""""""""""""""""

मा.अंजुम इनामदार

अध्यक्ष मूलनिवासी मुस्लीम मंच

9028402814

Post a Comment

Previous Post Next Post