शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची घेतली भेटकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा सहकारी बॅंकेचीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठकांच्या फेऱ्या सुरू असतानाचा आता या दोन्ही संस्थांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कागलच्या "शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी (ता. 13 मार्च) घाटगे यांनी आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

समरजितसिंह घाटगे यांनी कागल विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मतदार संघातील आंबेओहोळ प्रकल्प असो किंवा तालुक्‍यातील अन्य कोणताही प्रश्‍न, संधी मिळेल त्याठिकाणी घाटगे यांच्याकडून हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.दुसरीकडे, आयुष्यभर कॉंग्रेसमध्ये राहूनही विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन इचलकरंजी मतदार संघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले आमदार प्रकाश आवाडे यांनी विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साथ देत आपला इरादा स्पष्ट केला आहे.

घाटगे आणि आवाडे यांच्यात एक समान धागा आहे, तो चांगल्या चालवलेल्या सहकारी संस्थांचा. या दोघांच्या नेतृत्त्वाखाली साखर कारखाना असो किंवा सूत गिरणी, सहकरी बॅंक, दूध संस्था यांचा केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे; तर पश्‍चिम महाराष्ट्रात दबदबा आहे. दोघांच्या दृष्टीने या जमेच्या बाजू आहेत. त्या जोरावरच आता थेट जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये घाटगे यांनी लक्ष घातले आहे.

पूर्वी आपल्या संस्था भल्या आणि आपण अशीच मानसिकता असलेल्या समरजितसिंह घाटगे यांचा हा पुढाकार चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार प्रकाश आवाडे हे पूर्वी जिल्हा बॅंकेत संचालक होते, नंतर त्यांनी आपले जवळचे कार्यकर्ते विलास गाताडे यांना बॅंकेत पाठवले. आता त्यांचे पुत्र राहुल हे गोकुळ दूध संघाचे मतदार आहेत. या जोरावर हे दोघेही जिल्हा बॅंक असो किंवा "गोकुळ' मध्येही आव्हान उभे करू शकता

Post a comment

0 Comments