पुणे लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय नाही , पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत जी संचारबंदी लागू होती. ती कायम राहणार 

पुणे : पुण्यासह राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. त्यातच पुण्यात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यावर आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पुणे शहर रात्री 10 वाजता बंद करण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुन्हा लॉकडाउन लागू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय न घेता पुणेकरांना त्यानुसार, लग्नसमारंभ, धार्मिक सोहळे आणि इतर कार्यक्रमांना 50 टक्केच उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरातील मॉल, चित्रपटगृहे रात्री दहापर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय बाजारपेठा आणि दुकाने रात्री 10 पर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत जी संचारबंदी लागू होती. ती कायम राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. पण शाळा-कॉलेजेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील उद्यानेही संध्याकाळी बंद केली जाणार आहे. 

Post a comment

0 Comments