पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊन नको, अशी भूमिका जाहीर केली,. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विभागीय आयुक्‍त सौरव राव यांना निवेदन दिलेपुणे – करोनामुळे गतवर्षी झालेल्या लॉकडाऊमुळे आर्थिक घडी विस्कटली असून, आता ती कोठे सुरळीत होत आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन हा पर्याय नाही असे सांगत पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊन नको, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्याबाबत महासंघाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विभागीय आयुक्‍त सौरव राव यांना निवेदन दिले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा कायमस्वरुपी पर्याय नाही. कारण, गतवर्षी करोनामुळे सहा ते सात महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली. आता कुठे ती सुरळीत होत असताना, पुन्हा लॉकडाऊन केल्यास त्याचा फटका व्यापाऱ्यासह कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना बसेल. शहरात पुण्यात दहा लाख कामगार असून त्यांच्यावर कुटुंबियांची जबाबदारी आहे.

करोनाचा संसर्ग वाढीला व्यापार हा कारणीभूत नसून, आणखी काही वेगळी कारणे आहेत याकडे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी उपमुख्यमंत्र्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधत लॉकडाऊन जाहीर करू नये, अशी मागणी करताना त्याचा मोठा परिणाम सामान्यांवर होईल, अशी भीती महासंघाने व्यक्‍त केली.

Post a comment

0 Comments