भारताला कोरोनापासून मुक्त करण्याचा संकल्प करूया


चिक्कोडी

आज आज चिक्कोडी शासकीय तालुका रुग्णालयात, राज्य महिला व बालविकास विभाग,अपंगत्व आणि ज्येष्ठ नागरिकांचे सशक्तिकरण विभागाच्या मंत्री सौ. शशिकला जोल्ले जी(वहिनी)* यांनी कोविड - 19 लसचा पाहिल्या टप्याचा डोस घेतले. नंतर कोरोना वॉरियर्स म्हणून नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व सर्व कर्मचार्‍यांचे आभार मानले.

सर्व ज्येष्ठ नागरिक व पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर नोंदणी करुन कोविड लस घ्यावी. स्वतःहून लस घेऊन, एकत्र कोरोना विरुद्ध लढूया. भारताला कोरोनापासून मुक्त करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया असे सांगीतले. या वेळी तालुका वैद्याधिकरी डॉ. विठ्ठल शिंदे, मुख्य वैद्याधिकरी श्री संतोष कोन्नुरे, आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments