जयसिंगपूर बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रस्त्यावर २ कोटी २५ लाखाच्या पूल उभारणीस मंजुरी. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर



जयसिंगपूर-

जयसिंगपूर बसस्थानकापासून जयसिंगपूर रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्त मंदिराशेजारी असलेल्या जुन्या शाहूकालीन जीर्ण झालेल्या व रहदारीसाठी अरुंद ठरत असलेल्या पुलाला पर्याय म्हणून नव्याने पूल बांधण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून २ कोटी २५ लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे,

जयसिंगपूर बसस्थानकापासून जयसिंगपुर रेल्वे स्टेशन मार्गावरून पुढे उमळवाड, कोथळी, जैनापुर, निमशिरगाव, दानोळी कवठेसार याच बरोबर शेजारच्या हातकणंगले तालुक्यांमधील कुंभोज बाहुबली या परिसरामध्ये जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी या सर्व घटकांची नित्याची येजा या मार्गावरून होत असते येथील दत्त मंदिर परिसरात शेजारी असलेला शाहूकालीन पूल वाहतुकीसाठी अरुंद व धोकादायक बनला असल्याने या ठिकाणी नवीन पूल उभा करावा अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अनेक वर्षांपासून होती,

१२ मीटर रुंदीने हा पूल उभारला जाणार असून पूलाला ८ मीटर चे तीन गाळे उभारले जाणार असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली,

या पुलामुळे शिरोळ तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागांमधील गावांसाठी मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याकामी सहकार्य केल्याबद्दल मंत्री यड्रावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post