आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित सांगली निवारा भवन येथे महिलांचा भव्य मेळावा संपन्न

  (हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)    

आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त सांगली निवारा भवन येथे महिलांचा भव्य मेळावा संपन्न मेळावा सुरू होण्यापूर्वी सूमन पुजारी, विद्या कांबळे, चांदणी साळुंखे यांनी सांगली भारती हॉस्पिटल येथे जाऊन शकीला मुजावर या आशा महिलेची भेट घेतली. तसेच आशा संघटनेच्या वतीने त्यांच्या औषध उपचारासाठी रोख पाच हजार रुपये रक्कम शकिला यांची बहीण हसीना मुजावर यांच्याकडे दिली. त्यानंतरही महाराष्ट्रातील आशा भगिनींना संघटनेच्या वतीने आवाहन केले आहे की, शकीला मुजावर या महिलेस  जास्तीत जास्त मदत करावी आवाहन करण्यात आलेले आहे*. 

        या मेळाव्यास मार्गदर्शन करीत असताना प्रमुख वक्त्या व लेखिका विनिता मालती हरी यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन स्त्रियांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे .कारण या आंदोलनामध्ये स्त्रियांचा सहभाग महत्त्वपूर्ण बनलेला आहे. म्हणूनच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या साठी केलेले तीन कायदे आहेत त्याचा कसा विपरीत परिणाम महिलांच्या होणार आहे ते त्यांनी विशद करून सांगितले .गहू आणि तांदूळ यासारख्या महत्त्वाच्या शेतीमालास मिळणारी हमी रद्द झाल्यास या देशातील अन्नसुरक्षा धोक्यात येणार आहे. या देशातील सर्व शेतीचे कंत्राटीकरण करणे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबरच महिलांच्या वर अत्यंत हानीकारक परिणाम होणार आहे. या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा सुमन पुजारी यांनी सांगितले की भारत सरकारच्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढली असून सर्वसामान्य माणसांना महागाईमुळे जगणे अशक्य होऊन बसलेले आहे त्याची सर्वात मोठी झळ कष्टकरी शेतकरी शेतमजूर मोलकरीण महिलांना सोसावी लागत आहे. या मेळाव्यास बांधकाम कामगार संघटनेचे नेते कॉ शंकर पुजारी यांनीही पाठिंबा दिला. मेळाव्यामध्ये आशा महिला संघटनांचे प्रतिनिधी विद्या कांबळे ,चांदणी  साळुंखे ,वर्षा गडचे व निवारा बांधकाम संघटनेचे संतोष  बेलदार इत्यादींनी हा मेळावा संघटित करून आपले मनोगत व्यक्त केले*

Post a comment

0 Comments