आमदार मा.प्रकाशराव आवाडे यांच्या १५ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी व परिसरातील महिला कांडी कामगारांचा अपघाती विमा इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन मोफत उतरविणार



इचलकरंजी १० :आमदार मा.प्रकाशराव आवाडे यांच्या १५ मार्च २०२१ रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून इचलकरंजी व परिसरातील महिला कांडी कामगारांचा अपघाती विमा  इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन मोफत उतरविणार आहे. 

मा. आमदार प्रकाशराव आवाडे महिला कांडी कामगार सुरक्षा विमा कवच ” या नावाने ही योजना दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन दि ओरियंटल इन्शुरन्स कंपनीची विमा पॉलिसी सुरू करीत असून इचलकरंजी व परिसरातील सर्व महिला कांडी कामगारांनी किंवा त्यांच्या कारखानदार मालकांनी दि. २० मार्च २०२१ पर्यंत त्यांची नाव नोंदणी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या कार्यालयात करायची आहे. यासाठी १ फोटो, आधारकार्डची झेरॉक्स, मोबाईल नंबर व वारसाचे नांव दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनमध्ये नोंदवायचे आहे.

या विमा संरक्षणामध्ये २४ तास संरक्षण कामावर असताना व नसतानाही अपघाती मृत्यु झाल्यास रू. १ लाख, कायमस्वरूपी अपंगत्व आलेस रू. १ लाख त्याचबरोबर शरीराचा एखादा अवयव निकामी झालेस रू. ५० हजार इतका अपघाती विमा कामगार महिलेस किंवा वारसास मिळणार आहे. इचलकरंजी व परिसरामध्ये दरवर्षी अनेक महिला कामगारांचा अपघात होतो. व अनेक महिला कामगारांचा दुर्देवी मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते. त्यांना या विमा पॉलिसीमुळे मदत होणार आहे. यापूर्वीही दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने महिला कामगारांच्यासाठी अँपरन वाटप केले होते. यावर्षी मा.आमदार प्रकाश अवाडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने महिला कांडीकामगार अपघाती विमा संरक्षण ही योजना सुरू करीत आहोत. 

तरी सर्व महिला कांडी कामगार किंवा त्यांचे कारखानदार मालक यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनकडे दि. २० मार्च २०२१ पुर्वी नोंद करावी असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post