श्री.छत्रपती शिवाजी मार्केट जळीत दुकानांचे पुनर्वसन करण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आदेश.

 


पुणे : पुणे लष्कर भागात ऐतिहासिक श्री.छत्रपती शिवाजी मार्केट येथे लागलेल्या आगीमुळे २५ दुकाने जळून भस्मसात झाली होती.पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे निधी नसल्यामुळे या दुकानांचे पुनर्वसन रखडले होते त्यामुळे श्री.छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार कमलताई ढोले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांची विधानभवनमध्ये भेट घेऊन जळीत दुकानांच्या पुनर्वसनासाठी विनंती केली.

त्यावर मा.अजितदादा पवार यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना जळीत दुकानांची पुर्नबांधणीचे आदेश दिले.सदर काम पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची ना हरकत प्रमाणपत्र घेऊन करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा.मंजूरभाई शेख, शंकर सुर्वे, शरद बोराटे, शशिकांत परदेशी, सागर वांजळे ,धनंजय उरड यांनी मा.अजितदादा पवार व कमलताई ढोले-पाटील यांचे आभार मानले.

मा.मंजूरभाई शेख 

अध्यक्ष- श्री.छत्रपती शिवाजी मार्केट व्यापारी संघटना

Post a comment

0 Comments