वाहन नोंदणी आणि वाहन परवाना असे आरटीओतील सर्व व्यवहार लवकरच आधार कार्डशी लिंक करण्यात येणार
केंद्र सरकारने सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याचा धडाका लावला असून वाहन नोंदणी आणि वाहन परवाना असे आरटीओतील सर्व व्यवहार लवकरच आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयातील गर्दी 20 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट्स (आरसी) आधारकार्डच्या 12 आकडी क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले असल्याची माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली. एकदा हे काम पूर्ण झाले की 'सारथी आणि वाहन' ही सध्याची ऑनलाईन यंत्रणा आधारशी संलग्न होईल. आधार क्रमांकाशी संलग्नता केल्याने कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओ कार्यालयात येणाऱयांची संख्या कमी होईल.

Post a comment

0 Comments