ओतूरच्या गीता नितीन पानसरे यांची सरपंचपदी तर प्रेमानंद जयसिंग अस्वार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली



ओतूर - जिल्ह्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ओतूरमध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी मंगळवारी (दि. 9) निवडणूक झाली. यात गीता नितीन पानसरे यांची सरपंचपदी तर प्रेमानंद जयसिंग अस्वार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

सरपंच पदासाठी गीता नितीन पानसरे व शकुंतला बाबाजी डुंबरे यांनी अर्ज दाखल केले होते. तर उपसरपंच पदासाठी प्रेमानंद जयसिंग अस्वार, आशिष शामकुमार शहा यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान माघारीच्या वेळी शकुंतला डुंबरे व आशिष शामकुमार शहा यांनी अर्ज माघार घेतल्याने गीता पानसरे ह्या सरपंच पदी व प्रेमानंद अस्वार यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आल्याचे निवडणुकीचे अध्यासी अधिकारी लक्ष्मण झांजे व सहायक ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी यांनी जाहिर केले.या निवडीवेळी जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष तांबे, जी. एम. डुंबरे, गोविंदराव तांबे, तुषार थोरात, संभाजी तांबे, जयप्रकाश डुंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष ए. तांबे, बाबाजी डुंबरे, दयानंद डुुंबरे, जालंदर पानसरे यांच्यासह ओतूर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डुंबरे, वनिता बटवाल, रंजना डुंबरे, आशिषकुमार गोंदके, राजेश वाकर, शोभा ढमाले, मनिषा वारे, आशिष शहा, वैशाली ताजवे, छाया तांबे, गोरखनाथ फापाळे, संचित फापाळे, दिलीप डुंबरे, मयुरी खंडागळे, शकुंतला डुंबरे व ओतूरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा ओतूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ओतूरच्या नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य काम करणार असून, गावच्या कचरा व्यवस्थापन वाड्यासमोरील रस्ते, ग्रामीण रुग्णालय अशा प्रमुख प्रश्‍नांवर भर देऊन गावचा विकास साधणार असल्याची ग्वाही सरपंच गीता पानसरे व उपसरपंच प्रेमानंद अस्वार यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post