जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत कबड्डी प्रिमियर लीग'ची या स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी केला जात आहे.


      इस्लामपूर : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर (राजारामनगर) येथील जयंत स्पोर्ट्स च्या मैदानावर आयोजित 'जयंत कबड्डी प्रिमियर लीग'ची तयारी पूर्ण झाली आहे. जयंत पाटील यांनी मैदानस भेट देवून पाहणी केली. प्रो कबड्डी, महा कबड्डीनंतर राज्यात प्रथमच ही कबड्डी लीगला होत आहे. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी स्पर्धेचा शुभारंभ केला जात आहे. स्पर्धा पाच दिवस चालणार आहे. ही माहिती मुख्य संयोजक,नगरसेवक खंडेराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले ,' सोमवारी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उघड्या ट्रॉली मधून खेळाडूंची मिरवणूक काढली जाणार आहे. यल्लाम्मा चौक,गांधी चौक,कोर्टपासून ही मिरवणूक स्पर्धा स्थळी येणार आहे.या लीगमध्ये देवराज पाटील कासेगाव यांचा राजारामबापू ईगल्स, रणजित पाटील कामेरी यांचा स्व.जगदीश पाटील(आप्पा) रायडर्स, लिंबाजी पाटील, ब्रह्मानंद पाटील तांबवे यांचा नरसिंह टायगर्स, शिवाजी पवार इस्लामपूर यांचा यशोधन चॅलेंजर्स, पृथ्वीराज पाटील ओझर्डे यांचा अदिती पँथर्स,रविंद्र पाटील वाळवा यांचा राजेंद्र पाटील युवा मंच फायटर्स,अतुल लाहिगडे कासेगाव यांचा शरद लाहिगडे हरिकन्स,सागर पाटील,नितीन कोळगे जुनेखेड यांचा स्फुर्ती रॉयल्स हे आठ संघ साखळी पध्दतीने खेळणार आहेत. दररोज दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत सहा सामने खेळविले जाणार आहेत.

या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास रुपये २५ हजार,द्वितीय विजेत्या संघास रुपये १५ हजार,तर तिसऱ्या विजेत्या दोन संघांना प्रत्येकी ७ हजार रोख बक्षीस,तसेच आकर्षक चषक दिले जाणार आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ठ रायडर्स,उत्कृष्ठ डिंफेडर,तसेच वन डे बेस्ट प्लेअर अशी व्यक्तिगत बक्षिसेही दिली जाणार आहेत. कबड्डी प्रेमींच्या बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था केली. यामध्ये महिलांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. गाड्यांच्या पार्किंगसाठी मैदानसमोर चे,तसेच बाजूचे प्लॉट रिकामे केले असून स्मशान भूमी शेजारच्या रस्त्यावर दोन चाकी गाड्यांचे पार्कींग केले जाणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्थानिक वाहिनीवरून केले जाणार असून साधारण १ लाख कबड्डीप्रेमी घरात बसून या स्पर्धेचा आनंद लुटू शकतात.

यावेळी राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, माजी नगरसेवक आयुब हवलदार, सदानंद पाटील,अतुल लाहिगडे, राजवर्धन लाड, हमीद लांडगे, युवक राष्ट्रवादीचे शहर संघटक सागर जाधव, साखराळे ग्रामपंचायत सदस्य उमेश रासनकर, विजय देसाई उपस्थित होते. जयकर पाटील (साखराळे),शिवाजी पाटील, विजय लाड, अजय थोरात, किरण पाटील,प्रसाद कुलकर्णी, अक्षय पाटील, अभिजित कांबळे, विजय महाडिक, राजेंद्र पाटील, किरण नलवडे यांच्यासह जयंत स्पोर्ट्सचे खेळाडू, सदस्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Post a comment

0 Comments