वाळू तस्करांच्या 13 बोटी दौंडच्या तहसीलदारांच्या पथकाने जिलेटिनच्या साहाय्याने उडविल्या भीमा नदीत बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा  करणाऱ्या वाळू तस्करांच्या 13 बोटी दौंडच्या तहसीलदारांच्या पथकाने जिलेटिनच्या साहाय्याने उडविल्या आहेत. कर्जत तालुक्यातील खेड शिवारात ही कारवाई करण्यात आली आहे.

कर्जत-दौंड तालुक्यांच्या हद्दीचा फायदा घेत अनेक महिन्यांपासून भीमा नदीपात्रात बेकायदा वाळूउपसा सुरू असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना मिळाली होती.त्यांनी खेड हद्दीत पाच फायबर व एक सक्शन बोट, वाटलूज (ता. दौंड) हद्दीत तीन फायबर, दोन सक्शन तसेच भांबोरे (ता. कर्जत) हद्दीतील दोन फायबर व एक सक्शन बोट जिलेटिनच्या साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त केल्या.या कारवाईत दौंडचे तहसीलदार संजय पाटील, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडलाधिकारी मंगेश नेवसे, तलाठी शशिकांत सोनवणे, दीपक पांढरपट्टे, दीपक आजबे, संतोष इडुळे, हरिश्चंद्र फरांदे, बालाजी जाधव, मनोज तेलंग यांनी सहभाग घेतला.

Post a comment

0 Comments