येत्या सोमवारी महापालिकेची मुख्यसभा ऑनलाईन होणार असल्याने या मुख्यसभेची रंगीत तालीम महापालिकेत शनिवारी करण्यात आली.पुणे -
 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या सभेचे कामकाज ऑनलाईन न घेता ते पूर्ववत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, नगरविकास विभागाकडून सभा घेण्याचे आदेश लेखी आल्यानंतरच सभा पूर्ववत घेतली जाईल. अन्यथा पालिकेची मुख्यसभा ऑनलाईनच घेणार असल्याचा पवित्रा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आहे. .यावर राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे आणि महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी कडाडून टीका केली आहे. स्वतः महापालिकेतील खचाखच भरलेल्या सभागृहात विनामास्क वावरणाऱ्या महापौरांचा हा हट्ट अनाकलनीय आणि संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.आ. हा फोटो पहा ,यात मी आणि उपमुख्यमंत्री तसेच अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल मास्क घातलेले आहोत . आणि महापौरांसह भाजपचे सर्व जण पहा विना मास्क वावरत आहेत . बरे हा फोटो भामा आसखेड च्या उद्घाटन कार्यक्रमातला आहे . जेव्हा सभागृह खचाखच भरले होते. आणि या कार्यक्रमास महापालिकेने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत शासनाची कोणती परवानगी घेतली होती ? आता २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी शासनाने जाहीर केली आहे . त्यामुळे सिनेमागृहे नाट्यगृहे, बसेस ,आदी सर्व सुरु केले आहे. शासनाने २०० लोकांच्या सह्भागापर्यंत च्या कार्यक्रमाना परवानगी दिली याचा अर्थ प्रत्येक कार्यक्रमासाठी शासनाकडे आदेश प्रत्येकाने प्रत्येकवेळी मागावे असे काही नाही . मुख्य सभा पूर्ववत सुरु करण्यास या विनामास्क वावरणाऱ्या भाजपा वाल्यांना कोरोनाची भीती वाटतेय का ? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळेल . पण मुख्य सभेत पारदर्शक कारभार होऊ द्यायचा नाही हाच एकमेव उद्देश सत्ताधारी भाजपा आणि प्रशासन यांचा असला पाहिजे .असा संशय आल्या शिवाय राहत नाही .

दरम्यान महापौर यांनी ,'येत्या सोमवारी महापालिकेची ऑनलाईन सभा होणार आहे. या सभेत चर्चा तसेच गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यसभेत पडून असलेल्या शहराच्या धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही सभा घेतली जाणार असल्याचेही काही माध्यमांना सांगितले आहे. महापालिकेची शेवटची चर्चा तसेच धोरणात्मक निर्णय घेणारी मुख्यसभा मार्च 2020 मध्ये झाली आहे. त्यानंतर देशाव्यापी लॉकडाऊन झाल्याने नंतर नगरविकास विभागाकडूनही मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्यास नकार देण्यात आला आहे.

त्या बाबत  नंतर  परिस्थिती सुधारल्यावर पालिका प्रशासनाने वारंवार शासनास पत्र पाठवित सभा घेण्यास मुभा देण्याची विनंती केली असली तरी, शासनाकडून त्यास परवानगी नाकारण्यात आलेली आहे.असा दावा करण्यात आला आहे. तर शासनाने परवानगी नाकारल्याची पत्रे जाहीरपणे दाखवा असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. तर शासनाने अशा पत्रांना होकारार्थी अथवा नकारार्थी अशी कोणतीच उत्तरेच दिली नसल्याचे ,आणि आता याबाबत महापौर आदेश देतील त्याप्रमाणे कार्यवाही होईल असे नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी  सांगितले.

त्यातच, आता महापालिकेचे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असल्याने त्यापूर्वी मुख्यसभेत रखडलेल्या धोरणात्मक निर्णयासाठी ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला आहे. तर या सभेत अनेक अडथळे येतील तसेच महत्वाच्या विषयांवर चर्चा न होता भाजपकडून चुकीच्या पध्दतीने प्रस्ताव मान्य केले जातील अशी तक्रार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.त्यांनीही या प्रकाराची दखल घेत नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सभा घेण्यासाठी आदेश काढण्याच्या सूचना दिल्या असून महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनाही सूचना दिल्या आहेत.

मात्र शनिवार रविवार सुट्ट्या असल्याने अशा स्वरूपाचे आदेश आपल्यापर्यंत येऊ शकले नसावेत ,सोमवारी ते येऊ शकतील , केंद्र सरकारचे २०० लोकांपर्यंत च्या कार्यक्रमांना मुभा असल्याचे निर्देश असले तरी , महापालिकेची मुख्य सभा घेण्यासाठी राज्य सरकारचे लेखी निर्देश प्रमाणे आम्ही कार्यवाही करू .याबाबत सोमवारी नवे निर्देश येण्याची शक्यता असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी  सांगितले.

दरम्यान, येत्या सोमवारी महापालिकेची मुख्यसभा ऑनलाईन होणार असल्याने या मुख्यसभेची रंगीत तालीम महापालिकेत शनिवारी करण्यात आली. यावेळी, सर्व पदाधिकारी, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये टीव्ही तसेच संवाद साधण्यासाठी उपकरणे बसविण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर , स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.  

Post a comment

0 Comments