एकत्र येवून हातकणंगलेचा सर्वांगीण विकास करा...माजी आम.डॉ. मिणचेकर




महाविकासआघाडीच्या नगरसेवकांना सूचना


हातकणंगले प्रतिनिधी :-  

          आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हातकणंगले शहराचा मूलभूत सुविधांना प्राधान्य देत सर्वांगीण विकास करा अशा सूचना माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच नगरसेवकांना दिल्या ते त्यांच्या हातकणंगले येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.

         आढावा बैठकीत पाणी पुरवठा, नगरपंचायत जागा मागणी, बांधकाम परवाना, पार्किंग, तलाव सुशोभीकरण, अकृतिबंध, स्मशानभूमी, अतिक्रमण तसेच वैतागवाडी रस्ता करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. मिणचेकर म्हणाले की या सर्वच कामांना निधी मिळावा यासाठी मी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचेकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. पण नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा यामध्ये पाणी पुरवठा, रस्ते, गटर्स, लाईटची सोय याकडे प्राधान्याने लक्ष द्या तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक व नगरसेविका यांना विश्वासात घेऊन एकजुटीने शहराचा सर्वांगीण विकास करा अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

    यावेळी आढावा बैठकीस नगराध्यक्ष अरुण जानवेकर, उपनगराध्यक्ष उपाध्ये, नगरसेवक रणजित धनगर, गुरुदास खोत, केतन कांबळे, चंद्रकांत पाटील, अभिजित लुगडे, जयसिंग कांबळे, सुरेश इरकर, विजय खोत, रणजित पाटील पाणीपुरवठा अधिकारी बर्गे, अजित पाटील, दीपक वाडकर, शिवसेना शहराध्यक्ष धोंडीराम कोरवी, अनिल कदम प्रकाश कांबळे प्रसाद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post