सत्ताधारी मंडळींनी तीन वर्षात सत्कार करुन घेण्याखेरीज दुसरे काय केले...?* संपादक वसंतराव पाटील .हुपरीची बहुचर्चित पाणी योजना मंजूर करुन आणणेचे महत्वपूर्ण काम ज्येष्ठ नेते नानासाहेब गाट यांनी केले. त्यानंतर यातील महत्वाचा टप्पा म्हणजे दुधगंगेचे पाणी गावात आणणेचे काम तत्कालीन सरपंच दौलतराव पाटील यांनी केले आहे.

यानंतर ही योजना बारगळली ती आजतागायत तशीच आहे.गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या नगरपरिषद कार्यकालात योजना इंचभरही पुढे सरकली नाही.कारण हुपरी नगरपरिषदेत गेल्या तीन वर्षापासून सत्तेत असणाऱ्या ताराराणी आघाडी व भाजपाच्या मंडळींनी एकमेकांचे सत्कार करण्याखेरीज काहीही भरीव कार्य केलेले नाही.

या शहरासाठी जे हवे ते करण्याची धमक विरोधी आघाडीतील नगरसेवकांकडे निश्चितपणे आहे म्हणूनच पाणी योजना पूर्णत्वास नेणेची जबाबदारी त्यांचेकडे द्यावी अशी समस्त हुपरीकरांची ईच्छा आहे असे प्रतिपादन हुपरी समाचारचे संपादक वसंतराव ध.पाटील यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments