केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. तर्फे. सोशल मीडिया सेल च्या सदस्य व पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वितरित करण्यात आले.


केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. तर्फे आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021 सी.पी.जे.ए. च्या सोशल मीडिया सेल च्या सदस्य व पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वितरित करण्यात आले.

केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. हे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच विकासासाठी झटत असते. त्यात सी.पी.जे.ए. ने अनोखे पाऊल उचलले आहे. केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. च्या सोशल मीडिया विंग ची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. पत्रकार क्षेत्रात आपले करिअर करणाऱ्या इच्छुक लोकांसाठी सोशल मीडिया विंग या नवीन सेल ची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून लवकरच सोशल मीडिया विंग मधील सदस्यांसाठी पत्रकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. च्या गोरेगाव पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात सोशल मीडिया सदस्य व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर तसेच सोशल मीडिया विंग चे उत्तर-पश्चिम जिल्हा मुंबई सचिव शिवाजी खैरनार यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.

Post a comment

0 Comments