15 ग्राम पंचायतपैकी 8 ग्रामपंचायतवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात 29 पैकी 23 ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यानंतर आता निवडून आलेल्या 15 ग्राम पंचायतपैकी सरपंच, उपसरपंच यांच्या निवडी घोषित करण्यात आल्या. 15 ग्राम पंचायतपैकी 8 ग्रामपंचायतवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहेत.

पंधरा ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचाच्या निवडी झाल्या. त्यात सर्वाधिक ग्रामपंचायतवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले आहेत. यामध्ये मौजवाडी सरपंच, सावित्रा सुदर्शन चव्हाण उपसरपंच, आबा सयाजी जगताप कारळवाडी निर्मळवाडी शिवकन्या आनंद हुंबे, गुंदा सरपंचपदी नंदकिशोर मोरे उपसरपंच सूर्यकांत मोरे, तिपटवाडी सरपंचपदी जनाबाई देवराव शेंडगे उपसरपंच विष्णू प्रल्हाद जाधव, काटवटवाडी आशाबाई सिताराम खोड उपसरपंच सविता परमेश्वर पारवे, पिंपळगाव घाट सरपंच पुरी स्वाती दिनकर, उपसरपंच चंद्रकला संतोष तेलंग, जिरेवाडी सुरेखा बाबू शिंदे उपसरपंच सर्जेराव मोहिते, वरवटी आहेर धानोरा सरपंच मोनिका बालासाहेब इंगोले उपसरपंच, प्रदीप कोठुळे बेलखंडी पाटोदा शेख पाशाभाई सरपंचपदी तर उपसरपंचपदी अशोक प्रल्हाद काळे नागझरी या ग्रामपंचायतचा समावेशग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. शासनाच्या योजना गाव पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे, गावचा विकास करण्यासाठी एकदिलाने काम करा, निधी उपलब्ध करण्यासाठी माझे प्रयत्न असतीलच. ग्रामीण भागात पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पाणी पुरवठा योजना व अन्य विकासाची कामे करण्यासाठी आपण शासन दरबारी प्रस्ताव दाखल केलेले आहेत, हे प्रस्ताव मंजूर करून आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

Post a comment

0 Comments