सातत्याने होणार्‍या इंधन दरवाढीविरोधात शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेमोदी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय', 'चले जाव चले जाव, मोदी सरकार चले जाव' अशा जोरदार घोषणा देत सातत्याने होणार्‍या इंधन दरवाढीविरोधात शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रतिकात्मक 'बैलगाडी अ‍ॅम्बूलन्स' आणि सायकली चालवित केंद्र सरकारचा निषेध केला.


बालगंधर्व येथील झाशीची राणी चौकात झालेल्या या आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, विजय देशमुख, सविता मते, संगीता ठोसर, निर्मला केंडे, छाया भोसले, नगरसेवक बाळा ओसवाल, संजय भोसले, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट यांच्यासह असंख्य शिवसैनिक गॅससह पेट्रोल, डिझेल दरात सातत्याने होत असलेल्या वाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने मागील एक महिन्यात 11 वेळा इंधन दरवाढ देशातील जनतेवर लादली आहे. क्रूड तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात शंभर डॉलर पेक्षा कमी होउनही भारतात पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहेत. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळेच सर्वसामान्य माणसाचे जगणे अवघड झाल्याचे यावेळी शहप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले होते.

Post a comment

0 Comments