भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली आज विज महावितरण कार्यालयावर टाळे ठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले



इचलकरंजी  

 

भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली आज विज महावितरण कार्यालयावर टाळे ठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी महावितरणाने ७५ लाख विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने राज्यभर महावितरण केंद्रावर " टाळा टोको व हल्लाबोल" आंदोलन आयोजित केलेले आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघामध्ये कोरोना कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना अतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, अनेकांना रोजच्या रोज काम करुन आपल्या पोटाची खळगी भरावी लागते तसेच अनेकांचे व्यवसाय कोरोना संकट काळात बंद असलेने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले यामध्येच घरगुती, व्यावसायिक वीजबिले भरमसाठ आल्याने सर्वसामान्य नागरिकांनी गेली कित्येक दिवस बिले भरलेली नाहीत.


महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महाविकास आघाडी सरकारने वारंवार विजबिलामध्ये सूट देण्याची आश्वासने दिली. परंतु प्रत्यक्षात मात्र या सरकारने कोणतीही सूट दिलेली नाही आणि सर्वसामान्य जनतेला फसविण्याचे काम केलेले आहे. सध्या बिल न भरणाऱ्यांचे विज कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून कोरोना कालावधीतील विज बिल माफ करावे. आणि विज बिल न भरणाऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्याचे धाडस करू नये. 

यावेळी सरचिटणीस अरुण कुंभार, अरविंद शर्मा, अमर कांबळे, विस्तारक राजेंद्र पाटील, धोंडीराम जावळे, नगरसेवक किसन शिंदे, अमृता भोसले, महिला अध्यक्षा सौ. पुनम जाधव, योगिता दाभोळे, शशिकांत मोहिते, आण्णा आवळे, प्रदीप माळगे, बाळकृष्ण तोतला, दिपक पाटील, मयूर दाभोळकर, राजाराम पोवार, सुनिल कोरवी, प्रविण रावळ, सुधीर जोशी, अमित जावळे, किरण दंडगे, शुभम बरगे, अरविंद चौगले, मनोज तराळ, इलाई नायकवडे, दिपक तेलवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

BJP Maharashtra


#टाळा_ठोको_हल्लाबोल

Post a Comment

Previous Post Next Post