नियम न पाळणाऱ्या नागरिक, दुकानदारांवर कारवाई करण्यास प्रशासन ऍक्‍शन मोड मध्ये



 वाघोली -वाघोली येथे करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोनाबचावाचे नियम न पाळणाऱ्या नागरिक, दुकानदारांवर कारवाई करण्यास प्रशासन ऍक्‍शन मोड मध्ये आले आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे तर लोणीकंद पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुकानदार, नागरिकांनी मास्क वापरावा, सॅनिटायजरचा वापर करावा, गर्दी करू नये व नियम पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले आहे.

वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बी. जे. एस. कोवीड केअर सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक झाली. वाघोली ग्रामपंचायतीत सदस्य व नागरिकांची जनजागृतीविषयी बैठक बैठकीस तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके, वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव, विस्तार अधिकारी मोरे, वाघोलीचे सरपंच वसुंधरा उबाळे, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार, कोलवडीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, केसनंदचे ग्रामविकास अधिकारी गणेश वालकोळी, डॉ. नागसेन लोखंडे, कर्मचारी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post