महागाई विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीन निषेध करण्यात आला




पिंपरी - करोना काळात संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडला असताना छुप्यामार्गाने महागाईत या सरकारने वाढ केली आहे. त्याचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीन निषेध करण्यात आला. पिंपरी चौकात शनिवारी (दि.6) भाकरी थापत, अभिनव पद्धतीने आंदोलन केले.

केंद्र सरकारने आज पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये उच्चांक गाठला आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी हि भाववाढ करताना कष्टकरी व कामगार महिलांचा विचार केला नाही. 'उज्वला गॅस' योजनेतून एक कोटी गॅस कनेक्‍शन देण्याची फसवी घोषणा ती सत्यात उतरणार नाही. ही फसवी योजना आहे, करीत आहोत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केले.

यावेळी नगरसेविका सुलक्षणा धर, निकीता कदम, गीता मंचरकर, उषा काळे माजी नगसेविका शमीम पठाण, शिक्षण मंडळाच्या माजी उपसभापती लता ओव्हाळ, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्षा पल्लवी पांढरे, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगिता कोकणे, तसेच शहर संघटीका सुप्रिया भिंगारे, शहर उपाध्यक्षा मिना कोरडे, दिपाली देशमुख, अर्चना राऊत, माहेश्वरी परांडे, भोसरी महिला कार्याध्यक्षा संगीता आहेर, प्रभाग अध्यक्षा मंगल ढगे तसेच फैमिदा शेख, रुपाली भाडाळे, स्वप्नाली असवले, ज्योती निंबाळकर, संगिता जाधव, श्वेता हिमाणी, मनिषा जठार, सुंगधा पाषाणकर, प्रतिभा दोरकर, सिमा हिमाणे, लता पिंपळे, उषा चिंचवडे, अश्‍विनी पोळ, सविता धुमाळ आदी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post