रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची उद्या दि.8 फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठक.मुंबई दि.  7 -  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक उद्या सोमवार  दि.8 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता नवीदिल्लीत नवीन महाराष्ट्र सदन येथे  रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली आहे.

 यावर्षी पश्चिम बंगाल; केरळ; तामिळनाडू; आसाम आणि जम्मू काश्मीर या पाच राज्यांच्या निवडणूका होत असून त्या पार्श्वभूमीवर रिपाइं च्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशभरात रिपब्लिकन पक्षाने राबविलेली सभासद मोहीम आणि  पक्षांतर्गत निवडणुकीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे . अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली आहे.              

                 

Post a comment

0 Comments