पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने सेक्‍स रॅकेटचा केला पर्दाफाश
पिंपरी - पिंपळे गुरव परिसरातील एका रहिवासी सोसायटीमध्ये चार नायजेरियन महिला वेश्‍या व्यवसाय चालवत होत्या. त्या महिला 12 तरुणींकडून हा व्यवसाय करून घेत होत्या. पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने या सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश केला असून 12 नायजेरियन तरुणींची सुटका करत चार नायजेरियन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोरया पार्क, पिंपळे गुरव येथे एका इमारतीमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी सुमारे 20 दिवस माहिती घेऊन वेश्‍या व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणाचा माग मंगळवारी (दि. 2) सायंकाळी पावणे सहा वाजता रेस्क्‍यू फाउंडेशन, हडपसरचे दोन सदस्य आणि पोलिसांनी मिळून चार बनावट गिऱ्हाईकांना वेश्‍या व्यवसाय सुरु असलेल्या ठिकाणी पाठवले. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 16 नायजेरियन महिलांना ताब्यात घेतले. त्यातील चार महिला अन्य 12 महिलांकडून वेश्‍या व्यवसाय करून घेत होत्या. त्याबाबत त्या चार महिलांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ


या कारवाईमध्ये पोलिसांनी रोख रक्‍कम, मोबाइल फोन व इतर साहित्य असा एकूण 82 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चार नायजेरियन तरुणी अन्य 12 जणींना वेश्‍या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होत्या. त्यांचे पासपोर्ट पोलिसांकडून तपासले जात आहेत. तसेच पुढील कारवाई देखील केली जात असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी सांगितले..

Post a comment

0 Comments