यड्राव येथील रेणुका नगर दरम्यान एका गटारीमध्ये युवकाचा मृतदेह सापडला.(हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)

शिरोळ तालुक्यातील यड्राव ते रेणुकानगर दरम्यान रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या गटारीमध्ये दुपारच्या सुमारास एका 30 वर्षीय युवकाचा मूतदेह आढळून आला.त्या युवकांचे नाव संदीप वासुदेव  मांगलेकर असे आहे. सद्या राहणार यड्राव येथील पार्वती जवळ असणाऱ्या शिरगावे चाळ.

   या घटनेची माहिती मिळताच यड्राव गावचे पोलीस पाटील जगदीश संकपाळ हे दाखल झाले व त्यानंतर त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली.ही माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव व पोलीस हवालदार चलचुक साहेब, रवी महाजन यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला.

  घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की हा  युवक यड्राव मधील माजी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कोरवी यांच्याकडे वाहिफनी कामगार म्हणून कार्यरत होता.व तो एकटाच रूम मध्ये राहण्यास होता.तसेच त्याला दारू चे व्यसन देखील होते.त्यामुळे दारूच्या नशेत गटारी मध्ये पडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

    घटनास्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पुढे पाठवण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments