कोरोना : महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येईल, असं संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.मुंबई - तब्बल एक वर्ष लॉकडाऊनमध्ये गेल्यानंतर आता कुठं करोना संसर्ग आटोक्यात आला होता. त्यात लस आल्याने सर्वांच टेन्शन कमी झालं होतं. करोना प्रतिबंधक लसही संपूर्ण देशात देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्य निर्माण झालं होतं. मात्र आता करोना रुग्णांची वाढ होत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येईल, असं संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिले.

नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाही. हे घातक आहे. याची आपल्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे. उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्यात कदाचित काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन ते अडीच हजारांदरम्यान होती. ती आता 4 हजारांवर जाऊन पोहोचली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, तिथं कडक पावलं उचलली पाहिजे. करोना नियंत्रण करू शकलो नाही तर मग लॉकडाऊनच्या निर्णयाला जावं लागतं. ते आपणाला जायचं नाहीये. त्यामुळे कोरोना नियंत्रणात कसा राहिल, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.

Post a comment

0 Comments