दत्तक गावाची कथा, पुरग्रस्तांनी सांगावी कोणास व्यथा.

                                      मनू फरास : 

कोल्हापूर :  कोल्हापुर जिल्ह्यातील एक गाव. एका प्रसिद्ध सिने अभिनेत्याने दत्तक घेतल्याची बातमी टी व्ही वर झळकली आणि सन 2019 च्या महापुरात आपलं सर्व काही गमावलेल्या पुरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण फुलला.    गावातील पूर्ण पडलेली घरे बांधण्याचे निश्चित झाले.  कमिटी ही एक नाही दोन तयार झाल्या. पण पुरग्रस्तांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर कमिटीतील काही सदस्यांनी डोळा ठेवला. जो कोणी शासनाकडून मिळालेली मदत घरे बांधणाऱ्या मध्यस्थ संस्थेकडे जमा करेल त्याचेच घर बांधून मिळेल - असा फतवा काढला.                              पूरग्रस्त गावास प्रसिद्ध सिने अभिनेत्याने गाव दत्तक घेण्यापूर्वी ...पूरग्रस्त गाव पुराने घरे सगळी पडलेली ...आसरा शोधत होती. ज्यांना भाड्याने घरे मिळाली ती भाड्याच्या घरात राहिली. ज्यांना आसरा कुठेच भेटेना - ती आहे त्या जागेवर शेड मारून डागडुजी करून राहू लागली. पुराने भयभीत झालेली... पुराचा धसका घेतलेली ... सर्व काही शेती, घरे उध्वस्त झाल्याने, पुरा संसार मोडकळीस आल्याने ...त्याच्या काळजीने घरची कर्ती सवर्ती मानस, वयस्क माणसे आजारी पडली.  त्यांचा दवाखान्याच्या खर्च, यात शासनाकडून मिळालेली मदत खर्ची झाली.  कोणालाही स्वप्न पडल नव्हतं- एक प्रसिद्ध अभिनेता आपलं गाव दत्तक घेईल.                                        अभिनेता देव होऊन गावाच्या मदतीला धावला. पण तेही नियतीला मंजूर नाही.  या अभिनेत्याच्या माघारी घरे बांधकाम करणारी संस्था, यातील मध्यस्थ यांचा लालची डोळा पुरग्रस्तांना शासनाकडून मिळालेल्या मदतीवर स्थिरावला.  पुरग्रस्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद लालची माणसांनी हिरावून नेला. पुरग्रस्तांनी कमिटीतील शासकीय जबाबदार अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आमचा काय सम्बन्ध असे म्हणून आपली जबाबदारी झटकली. माणुसकीची संवेदना हरवलेल्या माणसांनी पुरग्रस्तांच्या लाचारीची थट्टा मांडली. कोणी घराचे बांधकाम व्हावे म्हणून शेतावर कर्ज काढले, कोणी घरावर कर्ज काढले. मध्यस्थ संस्थेला दिले.  मग घरांचे बांधकाम सुरू झाले. पण ज्यांची हातावरची पोट... ज्यांचं पुराने तर सार काही नेलं व कोरोना कालावधीत तर पूर्णच नंगे झालेल्या... जे लोक खायला देखील महाग आहेत.  काम करावं तेंव्हा खावं अशी ज्यांची अवस्था आहे.  दवाखाना, कोरोना, राहण्यासाठी आसरा नसल्याने तात्पुरत्या शेडसाठी शासनाकडून मिळालेली मदत खर्ची केली ...ती कुटुंब मात्र या अभिनेत्याच्या घरकुलापासून वंचित राहिली आहेत.  चांगली घरे पाडून बांधली जात आहेत पण पडलेली घरे मात्र अजूनही पुराची आठवण करून देत आहेत. तोंडात दात नसलेली इथली वयस्क माणसं मोठ्या अदबीने शिकलेल्या पोराला विचारतात - गाव दत्तक घेणं यालाच म्हणत्यात व्हय र बाळा?

Post a comment

0 Comments