माणुसकी फाउंडेशन व शहापूर​ पोलिसांमुळे​ वृद्धेला​ मिळाला आधार (हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले)                

वेळ रात्री साडेनऊची एक वृद्ध महिला हातात काठी, पाठीला मळकट पिशवी घेऊन​ लंगडत लंगडत यड्राव बेघर वसाहत व गावठाण मध्ये फिरत होती त्यामुळे नागरिकांतुन अनेक तर्कवितर्क व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तर भेदरलेल्या अवस्थेत असलेले वृद्ध महिला यामुळे​ अधिकच संभ्रम निर्माण झाला होता अशा अवस्थेत भागातील नागरीक, माणुसकी फाउंडेशन व शहापूर पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीतुन अखेर​ त्या​ वृद्ध महिलेला आधार मिळाला

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ यड्राव तालुका शिरोळ येथील गावठाण मध्ये रात्री साडेनऊ वाजता कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराजवळ भीक मागून उदरनिर्वाह करणारी एक वृद्ध महिला​ वयामुळे होत असलेल्या विस्मृति मुळे व त्याठिकाणी तिला कोणीतरी​ मारहाण केल्याच्या भीतीपोटी भटकत भटकत येथे पोहोचली प्रारंभी नागरिकानी​ तिची आस्थेने विचारपूस केली परंतु नागरिकांचा घोळका पाहून ती अधिकच भांबावलेल्या अवस्थेत मनात येईल ते बडबडत होती. त्यातच सोशल मीडियावर लहान मुले पळवणारी टोळी आपल्या भागात फिरत असून त्यात वृद्ध​ महिलेचा सहभाग आहे अशी पोस्ट​ फिरत असल्याने नागरिकांनाही तीही त्याच टोळीतील महिला आहे असा गैरसमज निर्माण झाल्याने​ नागरिकांच्या​ भीतीमध्ये भर पडली.​ नागरिकांच्या मनातील​ रोष पाहून पत्रकार संतोष चव्हाण भाजपचे जिल्हा सरचिटणीस औरंग शेख व पोलीस पाटील​ जगदीश संकपाळ यांनी नागरिकांना शांत करत या​ वृद्ध महिलेला सुरक्षित ठिकाणी ठेवले व शहापूर पोलिसांना याची माहिती कळवली घटनेचे गांभीर्य ओळखून शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम व उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांनी ताबडतोब पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवले तर उपनिरीक्षक राजेंद्र यादव यांनी माणुसकी फाऊंडेशनचे प्रवीण​ ​ केर्ले​ यांना फोनवरून याची माहिती घटनास्थळी पाचारण केले यावेळी प्रवीण केर्ले​ यांनी या​ वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन समजूत घालून शहापूर पोलिसांच्या गाडीतून इचलकंजी येथील आधार केंद्रत घेऊन गेले रात्रीच्या वेळी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने व शहापूर पोलिसांनी माणूसकी दाखवले आणि स्वतःच्या गाडीतून​ या वृद्ध महिलेला आधार केंद्रापर्यंत नेऊन त्याला मानसिक आधार दिला त्यामुळे शहापूर पोलीस​ ठाणे व माणुसकी फाऊंडेशनचे कौतुक होत आहे यावेळी माणुसकी फाउंडेशन चे शिवाजी भूयेकर बबलू कोळी सचिन भोसले विशाल पवार गणेश चोपडे​ त्यांनी मोलाचे सहकार्य केले .

Post a comment

0 Comments