ईडी जर त्यांना अटक करणार नाही अशी हमी देत असेल तर आम्ही याचिका मागे घेऊ.



 मुंबई - पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची आज ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे तसेच ईडीला जी कागदपत्रे लागतील ती देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

एकनाथ खडसे यांना ईडीने 30 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले होते. मात्र ईडीनं खडसेंविरोधात ईसीआयआर दाखल केल्याने खडसेंनी याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.तत्पूर्वी, खडसेंच्यावतीने कोर्टाला सांगितले होते की, ते आजारी असून ते उपचार घेत आहेत. ईडीनं इसीआयआर पीएमएलए कायद्यानंतर्गत दाखल केला आहे. ते समन्सला कोणतेही उत्तर न देता जर ते शांत राहिले तर ईडीतर्फे त्यांना अटकही केली जाईल. ईडी जर त्यांना अटक करणार नाही अशी हमी देत असेल तर आम्ही याचिका मागे घेऊ.

Post a Comment

Previous Post Next Post