महागाईचा भडका



 गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, गुरुवारी पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रतिलिटरसाठी 35-35 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत 710 रुपये 14 किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत.

अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लावण्यात आला होता. मात्र, या अधिभाराचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. मात्र, अर्थसंकल्पानंतर दोनच दिवसांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे.एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीत 14 किलोग्रॅमच्या सिलिंडरसाठी 719 रुपये प्रतिसिलिंडर मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 745.50 रुपये प्रतिसिलिंडर, चेन्नईत 745.50 रुपये तर मुंबईत 710 रुपये प्रतिसिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरातही वाढ केली आहे. राजधानी नवी दिल्लीत पेट्रोल 86.65 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 76.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 93.20 रुपये प्रतिलिटर तर डिझलेचे दर 83.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. चेन्नईत पेट्रोल 89.13 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 82.04 रुपये प्रतिलिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 88.01 तर डिझेल 80.41 रुपये झाले आहे.

2021 या वर्षात पेट्रोल डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहे. या वर्षात सुरुवातीलाच पेट्रोल डिझलेच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे महागाई वाढण्याचे संकेत मिळत आहेत. पेट्रोल डिझलेची दरवाढ झाल्याने त्याचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होतो. त्यामुळे महागाईतही वाढ होते.

Post a Comment

Previous Post Next Post