10 मे ला होणार जे एम म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश "मोठ्या संख्येने समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश"


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

पनवेल : शेतकरी कामगार पक्षाचे वजनदार नेते तथा जेष्ठ नेते  पनवेलचे मा. नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा शनिवार 10 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता  भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. खारकोपर रेल्वे स्टेशन समोर,  रामशेठ ठाकूर मैदान, प्लॉट नंबर 6, सेक्टर 12, उलवे नोड या ठिकाणी हा पक्षप्रवेश होणार आहे. 

         या पक्षप्रवेशाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, पर्यावरण मंत्री श्री.गणेश नाईक , मा.गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री.कृपाशंकर सिंह , माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, आमदार रवीशेठ पाटील,  माजी आमदार देवेंद्र साटम, माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह अनेक मान्यवर या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहणार आहेत.

       यावेळी श्री.जे एम म्हात्रे साहेब यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस, शेतकरी कामगार पक्ष विविध आघाड्यांचे पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे  मा.नगराध्यक्ष, मा. उपनगराध्यक्ष, मा.नगरसेवक, मा.जिल्हा परिषद सदस्य, अनेक मा. पंचायत समिती सदस्य, सरपंच–उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,  तसेच पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post