शासकीय दवाखान्यांचे मजबूतीकरण होवून शासकीय इमारतींना संरक्षण मिळणार
मनू फरास : 

कोल्हापूर :  पंचायत समितीच्या सभापती पदी कार्यरत असताना सभापतींनी या दोन्ही दवाखान्याच्या संरक्षक भिंत बांधकाम करणे आणि इमारतीचा परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सतेज उर्फ बंटी डी.पाटील साहेब यांच्या कडे जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली होती.सभापतींनी या दोन्ही दवाखान्याच्या संरक्षक भिंत बांधकाम करणे आणि इमारतीचा परिसर सुशोभीकरण करणे या कामासाठी लागणारे परिपूर्ण अंदाजपत्रक तयार करून पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता.दिनांक तेवीस (२३) जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत या दोन्ही कामांना पालकमंत्री मा.ना.सतेज उर्फ बंटी डी.पाटील साहेब यांनी प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिले होते . ही दोन्ही कामे मंजूर झाल्यामुळे शासकीय दवाखान्यांचे मजबूतीकरण होवून शासकीय इमारतींना संरक्षण मिळणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष या दोन्ही दवाखान्याच्या संरक्षक भिंत बांधकाम करणे आणि परिसर सुशोभीकरण करणे या कामाची सुरुवात केली जाणार आहे.

ही सर्व कामे मार्गी लागण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सतेज उर्फ बंटी डी.पाटील साहेब, तालुका राष्ट्रिय काॅंग्रेसचे नेते आदरणीय गणपतराव दादा पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.वाय.ए.पठाण साहेब ,तालुका राष्ट्रिय काॅंग्रेसचे अध्यक्ष श्री. सर्जेराव शिंदे,काॅंग्रेस कार्याध्यक्ष श्री.शेखर पाटील, जिल्हा युवा काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष श्री.नितीन बागे या सर्वांचे सहकार्य लाभले.

Post a comment

0 Comments