या गावात बोलली जातेय एकच म्हण; ''मुझे क्या मालूम, बायका को मालूम!''


 मनू फरास : 

कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिध्द असे गाव. या गावात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या तोंडी आपण काहीही विचारलं तर एकच वाक्य बाहेर येत ते म्हणजे ''मुझे क्या मालूम, बायकाको मालूम!''                                                         .हे वाक्य त्या गावातील लोकांच्या तोंडी कसे आले? त्याची खूपच चांगली पण विचार करायला लावणारी गोष्ट आहे.   या गावातील सरपंचांना कोणीही काहीही कुठल्याही विषयाबाबत विचारले तर ते ''मुझे क्या मालूम'' असे बेमालूम पणे बोलून जातात.   पण त्याचं काहीही चुकीच नाही.  कारण त्या गावच्या पंचायत मध्ये चालणारा सर्व कारभार हा त्यांचा मुलगा पाहतो. तसेच त्या पंचायतीत निम्म्याहून अधिक ह्या महिलाच आहेत.  कारभार मुलगा करीत असल्याने या नाममात्र सरपंचांना काहीही माहीत नाही.  त्यामुळे ते साहजिकच ''मुझे क्या मालूम ?'' असे बोलून जातात.  पण वारंवार त्यांच्या तोंडून तेच ते शब्द ऐकून एक युवक मात्र संतापला व भर पंचायतीसमोर सरपंच व त्याचा वाद सुरू असतानाच सर्व महिला सदस्याही बाहेर आल्या. त्या संतापलेल्या युवकाने महिला सदस्यांना समोर पाहून तो सरपंचांना  म्हणाला , ''मुझे क्या मालूम...? मुझे क्या मालूम... तो क्या ये बायकाको मालूम ! ''                   आणि त्या वेळेपासून त्या गावात ''मुझे क्या मालूम ..? बायकाको मालूम !'' ही म्हण रुजू झाली.

Post a comment

0 Comments