शिवसेना प्रणित शिव अंगणवाडी राज्य उपाध्यक्षा सुनिता ताई मोरे यांनी इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली
शिवसेना प्रणित शिव अंगणवाडी राज्य उपाध्यक्षा सुनिता ताई मोरे यांनी इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांनी त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव श्रीदेवी पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा नाजनीन शेख सांगली जिल्हा अध्यक्षा आरती कदम मिरज तालुका अध्यक्षा उज्वला मोरे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा म्हणून नाजनीन शेख यांची निवड झाल्याबद्दल  इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली यांचेकडून देण्यात येणारे ओळखपत्र  तसेच सांगली जिल्हा अध्यक्षा आरती कदम मिरज तालुका अध्यक्षा उज्वला मोरे यांनाही निवडीचे पत्र व ओळखपत्र सुनिता ताई मोरे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी या सर्वांचे सुनिता ताई मोरे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सुनिता ताई मोरे यांनी इंडियन रिपोर्टर असोसिएशन याबद्दल सविस्तर माहिती विचारून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या या संस्थेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या बऱ्याच पत्रकारांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते त्या सर्व पत्रकारांना येणाऱ्या अडीअडचणीच्या वेळी जी मदत लागेल ती आम्ही देऊ शासन दरबारी पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले यावेळी श्री कोटेचा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व आभार मानले

Post a comment

0 Comments