मणिपूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*


इंफाळ दि. 17 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.त्यासाठी सर्व विभागला ईशान्य भारतातील राज्यात विविध विकास योजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार  मणिपूरच्या सर्वांगी विकासासाठी आपण  प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन  आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले. आज ना रामदास आठवले मणिपूर दौऱ्यावर आले असता इंफाळ येथील  केशामथोन्ग या विधान सभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाची भव्य जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.त्यात ना रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मागर्दशन केले. या सभेचे आयोजन रिपाइं चे मणिपूर राज्य अध्यक्ष महेश्वर थोनाओझम यांनी केले होते. या सभेस येताना इंफाळ विमानतळावर ना रामदास आठवले यांचे प्रचंड भव्य स्वागत झाले. 

आगामी वर्ष 2022 मध्ये मणिपूर विधान सभेची निवडणूक होणार आहे.त्या निवडणुकीची तयारी आतापासूनच रिपाइं कार्यकर्त्यांनी करावी असे आवाहन करून  रिपाइं चे मणिपूर राज्य अध्यक्ष महेश्वर थोनाओझम यांनी  केशामथोन्ग विधानसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी असे ना रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.लॉकडाऊन काळात गरीबांचे हाल झाले मात्र लॉकडाऊनमुळेच लाखो लोकांचे प्राण वाचले.कोरोना च्या महामारीला लॉकडाऊन मुळे आळा बसविल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आपण आभार मानले पाहिजेत असे ना रामदास आठवले म्हणाले.लॉकडाऊनमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर गरीब जनतेची सेवा केली मदत केली.त्याप्रमाणेच मणिपूर मध्ये रिपाइं चे राज्य अध्यक्ष  महेश्वर थोनाओझम यांनी उत्कृष्ट कार्य केले. कोरोनायोद्धा म्हणून त्यांचे अभिनंदन ते पुढील वर्षी निश्चित मणिपूर विधान सभेत रिपब्लिकन पक्षाचे आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी रिपाइं चे विनोद निकाळजे ; हितेश देवरी यांचीही उपस्थिती होती.
               

Post a comment

0 Comments