वीज पुरवठा सुरू झाला आणि अंधाराचे जाळे नाहीसे झाले.



 पट्टणकोडोली येथील बेघर वसाहतीत वीजेच्या पुरवठ्याची समस्या होती, त्यामुळे येथील नागरिकांना गेल्या आठ वर्षांपासून अंधाराचा व अपुऱ्या वीजेचा सामना करावा लागत होता. दोन महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी याबाबत निवेदन देवून वीज पुरवठ्याची मागणी केली होती.परिसरातील वीजेची गरज व त्यांचा पाठपुरावा यांची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे काम होत शुक्रवारी या वसाहतीत वीज पुरवठा सुरू झाला आणि अंधाराचे जाळे नाहीसे झाले.यावेळी माजी खासदार निवेदिता माने, वीज वितरण कर्मचारी संघटना अध्यक्ष आर. एस. पाटील, जे.के. वसगडे सर, पट्टणकोडोली सरपंच जाधव वहिनी, उपसरपंच कृष्णात मसुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

दमदार आमदार राजू जयवंतराव आवळे

Post a Comment

Previous Post Next Post