ज्यांच्याकडे दिला नगरपरिषदेच्या कारभार; त्यांनीच भरविला घोटाळ्यांचा दरबार.




हुपरी : हुपरी नगरपरिषद हुपरी येथील शाहूनगर परिसरात सुमारे ७० ते ८० वर्षांपासून पूर्वापार वाहिवाटीची अंदाजे २५ फूट रुंदीचा व पूर्व पश्चिम चालीचा  ओढा आहे सदर ओढाच्या उत्तर बाजूस  कडील गट क्रमांक ८८३ पैकी शेत जमीन अमोल बंडोपंत गाठ, अजित नेमीनात मडके, देवयानी शिव शंकर माळी, कुंतीनात गाठ ,सुनील पुरंधर गाठ, प्रकाश जयसिंगराव चिटणीस, राजेश रामचंद्र भोजे वगैरे लोकांनी खरेदी करून या शेतजमिनीचा जिल्हाधिकारी कोल्हापूर  याचे कडून कोणतीही बिगर शेती करून न घेताच  रजत एजूकेशन सोसायटी या नावाने इंग्रजी माध्यमातील शिक्षण संस्था काडून त्या करिता विना परवाना बेकायदेशीर इमारत बांधून अनधिकृत शैक्षणिक वर्ग भरविले आहेत.सदरचा प्रकार उघडकीस आल्या मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

     या बाबत तक्रारदार  ऍडव्होकेट सुनील शंकरराव पाटील. रा. शाहूनगर वेताळ रोड  हुपरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की हुपरी नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी ,नगराध्यक्ष यांच्या संगनमताने रजत एज्युकेशन सोसायटी हुपरीचे चेअरमन, सेक्रेटरी व संचालक यांनी मिळून केलेल्या बेकायदेशीर कृत्याची चौकशी होऊन त्यांच्या विरुद्ध व संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी ऍडव्होकेट सूनील शंकराव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन हूपरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी , नगराध्यक्ष हूपरी , मंडलाधिकारी, तलाठी हुपरी ,  जिल्हाधिकारी कोल्हापूर,  या सर्वांना देण्यात आले आहे. या निवेदनावर सुनील शंकरराव पाटील यांचेसह असं की नागरिकांच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post