शमनेवाडी येथील चोरीप्रकरणी रुई येथील चोरट्यास सदलगा पोलीसांनी अटक केली

 रुई येथील चोरट्यास सदलगा पोलीसांनी, शमनेवाडीतील चोरीप्रकरणी अटक केली.

 


बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी) :

शमनेवाडी येथील चोरीप्रकरणी रुई येथील चोरट्यास सदलगा पोलीसांनी अटक केली.  सदलगा  पोलिस ठाण्याच्या हद्दीतील  शमनेवाडीमधील फिर्यादी  बाहुबली महावीर कुगे‌ यांच्या राहत्या घराचा कडीकोंडा मोडुन  दागीने व रोख रक्कम लंपास केले. त्यामध्ये सात ते आठ तोळ्यांचे तोडे,  तीन तोळ्यांचा बाजुबंद, व रोख रक्कम मिळून अंदाजे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला. 

   या प्रकरणाचा पोलीसांनी गांभीर्याने छडा लावुन रुई येथील चोरट्यास सदलगा पोलीसांनी अटक केली. प्रशांत रावसाहेब मस्कर ( वय २९, रा, रुई, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.  ही कारवाई पोलिस जिल्हा प्रमुख लक्ष्मण निंबरगी अतिरिक्त पोलिस जिल्हा प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे पोलिस उपअधीक्षक मनोजकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली  मंडळ पोलिस निरीक्षक आर.आर.पाटील, उपनिरीक्षक आर.वाय.बिळगी, सहायक उपनिरीक्षक व्ही.एस.हज्जे, एच.एम.देवर, एम.डी.दोडमणी व इतर सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments