आय.जी.एम च्या स्वच्छता प्रश्नी आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी अधिकाऱ्यांची केली कानउघडणी...
इचलकरंजी : स्वच्छता कर्मचारी नसल्या कारणाने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. ज्याठिकाणी स्वच्छतेची गरज आहे, तेथेच कचर्‍याचे ढीग व धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

 ▪️या संदर्भातील तक्रारींची गांभिर्याने नोंद घेत *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांनी आय.जी.एम रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन वॉर्डासह अतिदक्षता विभागाचीही पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी व नगरपरिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांची चांगलीच कानउघडणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. *दोन दिवसात स्वच्छता कर्मचारी न नेमल्यास आपण स्वत: आपल्या पध्दतीने यंत्रणा राबवू असा सज्जड इशाराही आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी दिला.

▪️यावेळी कपिल शेटके, राहुल घाट, सुहास कांबळे   यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , रुग्णांचे नातेवाईक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a comment

0 Comments