तारदाळ येथील वार्ड नंबर दोन मधील सांडपाणी दोन दिवसात निचरा करा... अन्यथा उपोषणाचा भागातील ग्रामस्थाचा इशारा


हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले.

                     हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील  वार्ड नंबर दोन मधील  सांडपाणी ची समस्या नित्याचीच बनली असल्याने याबाबचे निवेदन नागरिकांनी सरपंच यशवंत वाणी यांना दिले .तारदाळे मधील वार्ड नंबर दोन मधील सांडपाणी पाणी बाहेर जाण्यासाठी कोणताच मार्ग नाही .त्यामुळे संपूर्ण गटारीचे पाणी व सांडपाणी एकत्र गोळा होत तेथे राहणाऱ्या नागरिकांच्या दारापर्यंत आले आहे .त्यामुळे तेथील परिसरात डासांची उत्पत्ती व भयंकर दुर्गंधी पसरत आहे .याबाबत संबंधित ग्रामसेवक , सरपंच व भागातील ग्रामपंचायत सदस्य यांना नागरिकांनी वेळोवेळी समस्यांची जाणीव करून दिली पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे . येत्या दोन दिवसात ग्रामपंचायती ने  सांडपाणी निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे भागातील ग्रामस्थाचा वतीने देण्यात आले .यावेळी अमर पाटिल , विशाल पाटिल , श्रीकांत कोरे , प्रकाश पाटिल , यांचेसह भागातील ग्रामस्थ उपस्तीत होते .

         सदर भागात भुयारी गटर्स साठी पंधरा वित्त आयोगातुन पाच लाख रुपये निधी मंजूर आहे . परंतू ज्या शेतातून भुयारी गटर्स जाते ते शेतकरी व भागातील ग्रामस्थ यांच्यातील समन्वया आभावे गटर्सचे काम चालू करणास अडथळे येत आहेत. लवकरच यातुन मार्ग काढुन भुयारी गटर्स करण्यात येईल असे सरपंच यशवंत वाणी यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments