इचलकरंजी नगरपरिषद ची स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत कार्य शाळा संपन्न.






 इचलकरंजी :  इचलकरंजी नगरपरिषदे मार्फत आज दिनांक 10 फेब्रुवारी* *२०२१ रोजी शहरातील* *कार्यरत सर्व प्रभाग कमिटी, आरोग्य विभाग अधिकारी, सर्व SI व WI, सफाई कर्मचारी यांची भव्य अशी जंबो कार्यशाळा घेण्यात* *आली. कार्यक्रमाची सुरुवात मा. नागराध्यक्षा सौ. अलका स्वामी, मा. उपनगराध्यक्ष श्री.* *तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती मा. श्री. संजय केंगार तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते वृक्ष कुण्डलना पाणी देऊन झाली तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत घरोघरी चिटकविन्यात येणाऱ्या स्टिकर (पोस्टर ) चे अनावरण मान्यवर च्या हस्ते करण्यात  आले*. *कार्यशाळेसाठी उपस्थित सर्वाना मा. नगराध्यक्षा ॲड* *सौ. अलका स्वामी,मा. उपनगराध्यक्ष श्री. तानाजी पोवार,आरोग्य समिती सभापती मा. श्री. संजय केंगार यांनी मार्गदर्शन  केले.तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी सज्ज राहण्याचे आवाहन केले व लागणाऱ्या सर्व तयारीची पूर्तता करण्यास सांगितले व त्यासाठी लागणाऱ्या सर्वप्रकारच्या मदतीस तयार असल्याचे सांगितले. तसेच स्वच्छ सर्वेक्षणास आपली कोणती तयारी मुख्यत्वे गरजेची आहे याबद्दल नोडल ऑफिसर श्री. विश्वास हेगडे यांनी मार्गदर्शन केले.तसेच* *आपल्या इचलकरंजी शहरास आणखी उच्चांक गाठणेसाठी अवश्यक त्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन सिटी कोऑर्डिनेटर श्री प्रवीण बोंगाळे यांनी केले. मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. विजय पाटिल यांनी सर्व* *कर्मचारीना प्रभागमध्ये प्रत्यक्ष काम करण्यबद्दल मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट असणारे व सिटीझन फीडबॅकसाठी लागणारी आवश्यक ती सर्व तयारी कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक डॉ. शशांक वळवाडे यांनी कार्यशाळेमार्फत दिले. वॉर्डातील उत्कृष्ठ सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव मा. नगराध्यक्षा ॲड स्वामी , मा. आरोग्य सभापती श्री संजय केंगार व नगरसेवक, नगरसेविका यांच्या हस्ते पार पडला. शेवटी स्वच्छतेची शपथ व माझी वसुंधरा शपथ ग्रहण होऊन कार्यशाळा संपन्न झाली*. *कार्यशाळेमध्ये प्रमुख उपस्थिती मा. नगराध्यक्षा ॲड सौ.अलका स्वामी, उपनागराध्यक्ष श्री. *तानाजी पोवार, आरोग्य समितीचे सभापती श्री संजय केंगार, तसेच नगरसेविका सौ. वर्षा जोंग व सौ.स्मिता* *तेलनाडे,आरोग्य अधिकारी डाॕ सुनिलदत्त सगेंणवार स्वच्छ सर्वेक्षणाचे नोडल अधिकारी श्री विश्वास हेगडे, शहर समन्वयक अधिकारी श्री प्रविण बोंगाळे, जय भारत मते संस्थेचे संस्थापक डॉ. श्री शशांक वळवाडे व संस्थेचे आधीकारी श्री. प्रतीक आलासे,सोहेल खान,साहिल मुल्ला व  सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते*.

Post a Comment

Previous Post Next Post