कोरोनाच्या पार्श्भूमीवर आज इचलकरंजी शहर सनियंत्रण समितीची बैठक.इचलकरंजी, ता.२३कोरोनाचा प्रादर्भाव सर्वत्र वाढत आहे. या अनुषंगाने शासनस्तरावरून सुचना प्राप्त होत आहेत. त्यास अनुसरून इचलकरंजीशहरामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत इचलकरंजीशहर सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन नगराध्यक्षा सौ.अलकास्वामी यांनी आज मंगळवार ता.२३ फेब्रुवारी रोजी दु.१२.१५वाजता नगराध्यक्ष दालनात केलेले आहे.राज्याच्या विविध जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. त्याचबरोबर इचलकरंजीत सुध्दा कोरोनाचे रूग्ण दिसून येत आहेत. शहरात पुन्हा कोरोनाची लाट येऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेसाठी सदर बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी केले आहे..

Post a comment

0 Comments