केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची अमित जोगी यांनी घेतली भेटकेंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची अमित जोगी यांनी घेतली भेट


 जनता काँग्रेस छत्तीसगड चे अध्यक्ष अमित जोगी यांना एन डी ए मध्ये  येण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिले निमंत्रण.


मुंबई दि. 22 -  छत्तीसगड चे माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित जोगी यांचे पुत्र आणि जनता काँग्रेस छत्तीसगड चे अध्यक्ष अमित जोगी यांनी आज मुंबईत येऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत अमित जोगी यांनी त्यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगड पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एन डी ए ) सहभागी व्हावे याबाबत चर्चा झाली.ना रामदास आठवलेंनी अमित जोगी यांना एनडीए मध्ये  सामील होण्याचे निमंत्रण दिले.त्यावर अमित जोगी यांनी अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी  केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले हे अमित जोगी यांची भेट करून देणार असून त्या भेटीत अमित जोगी यांच्या एनडीए प्रवेशा वर शिक्कामोर्तब होईल.


छत्तीसगड मध्ये अमित जोगी यांच्या जनता काँग्रेस छत्तीसगड चे 7 आमदार निवडुन आले आहेत. छत्तीसगड मधील दलित जनतेला केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या सारखा राष्ट्रीय नेतृत्वाची गरज आहे.त्यामुळे ना रामदास आठवले यांनी छत्तीसगड मध्ये ही वेळ द्यावा अशी विनंती अमित जोगी यांनी ना रामदास आठवले यांना केली.त्यावर आरपीआय आणि जनता काँग्रेस छित्तीसगड यांच्या एकत्र काम करण्यासाठी आपण एनडीए मध्ये येण्याचे आवाहन ना रामदास आठवले यांनी अमित जोगी यांना केले आहे. 

ना रामदास आठवले यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर दलित बहुजन जनतेत लोकप्रिय असुन छत्तीसगड मधील दलित आदिवासी बहुजन समाजाला ना रामदास आठवले यांनी वेळ द्यावा असे मत अमित जोगी यांनी यावेळी व्यक्त केले.          

Post a comment

0 Comments