मालपाणी समूहाच्या मुख्य कार्यालयावर आयकर विभागाने टाकली मोठी धाड.गेल्या ७० वर्षापासून गाय छाप तंबाखू म्हणजे मालपाणी समूहाच्या मुख्य कार्यालयावर आयकर विभागाने मोठी धाड टाकली आहे. मालपाणी समूहाच्या तब्बल ३४ ठिकाणी आयकर विभागाने १७ डिसेंबरला ही छापेमारी केल्याचे समोर येत आहे. यात राज्यातील संगमनेर, पुणे, पाथर्डी यासह राज्यातील विविध ठिकाणी तीन दिवस हे छापासत्र सुरु होते.

243 कोटी रुपयांची बेहिशेबी तंबाखू विक्री केल्याची माहिती आयकर विभागाच्या औरंगाबाद टीमच्या कारवाई दरम्यान समोर आली. या समुहाच्या एक्सेल सीट आणि इतर कागदपत्रांमधून ही माहिती समोर आली. याबरोबर बांधकाम क्षेत्रातही ४० कोटींच्या बेहिशेबी व्यवहार केल्याचे माहिती समोर आली आहे.

Post a comment

0 Comments