छ. शिवाजी महाराजांची अश्वारुढ मुर्ती लवकरच उभारण्यात येणार.हुपरी: गावभागातील छ.शिवाजी चौक येथे अश्वारुढ शिवमुर्तीची स्थापना होणारच.

वडगांव येथे नुकतीच अश्वारुढ शिवमुर्तीची स्थापना करणेत आली. त्याबाबत अधिक माहितीसाठी हुपरीतील नगरसेवक गणेश वाईंगडे, जनसेवक मनोज पाटील, उद्योगपती सतिश भोजे यांनी वडगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक अजय थोरात आदि मान्यवरांची भेट घेऊन शिवमुर्तीची स्थापना व परिसर सुशोभीकरण याबाबत प्रदिर्घ चर्चा केली. यावेळी मान्यवरांचे मिळालेले मार्गदर्शन आणि लाभलेले अनुभवाचे बोल आम्हाला नवी ऊर्जा आणि चैतन्य देणारे ठरले आहेत.

आदरणीय सन्माननीय व्यक्तीमत्वांच्या मार्गदर्शनातून हुपरी नगरीत उभारले जाणारे शिवशिल्प हे समस्त शिवभक्तांसाठी प्रेरणास्थळ होणार आहे यात शंकाच नाही.* 

Post a comment

0 Comments