510 दिव्यांग लाभार्थ्यांच्या खातेवर 55.70 लाखाचे अनुदान जमा नगराध्यक्षा अॅड सौ. अलका स्वामीइचलकरंजी : नगरपरिषद हद्दीतील सन 2020-2021 या सालामध्ये दिव्यांगाना अनुदान मागणी करणेकामी मुदतीत आलेल्या 1450 व मुदतीनंतर आलेल्या 120 असे एकूण 1570 दिव्यांग लाभार्थ्यांची मागणी अर्ज प्राप्त झाले आहे.

   याकामी दिव्यांग लाभार्थ्यांना वाटपकरणेसाठी रक्कम रु. 1.70 कोटी इतके अनुदानाची तरतुद केली आहे.सदर अनुदानापैकी 40टक्के ते 59 टक्के दिव्यांग असणा-या 300 लाभार्र्यांना रक्कम रु. 10500/- प्रमाणे 31.50लाख, 60 टक्के ते 79 टक्के दिव्यांग असणा-या 100 लाभार्थ्यांना रक्कम रु.11000/- प्रमाणे11.00 लाख व 80 टक्के ते 100 टक्के दिव्यांग असणा-या 110 लाभार्थ्यांना रक्कम रु.12000/- प्रमाणे 13.20 लाख असे एकूण 510 दिव्यांग लाभार्यांच्या बँक खातेमध्ये रु.55.70 लाख इतकी रक्कम जमा करणेत आलेली आहे. तसेच सदर 540 दिव्यांग लाभार्थ्यांचे लेखापरीक्षण सुरू असून उर्वरीत 520 दिव्यांग लाभार्यांचे अर्जांचे खातेअंतर्गत छाननी करणेचे काम सुरु असून उर्वरीत अनुदान दिव्यांग लाभार्थ्यांचे खातेमध्ये टप्याटप्याने जमा करणेत येईल  अशी माहीती नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिली.याकामी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, महिला बाल कल्याण सभापती सौ. सारीका पाटीलउपसभापती सौ. सुनिता शेळके, बांधकाम सभापती श्री. उदयसिंग पाटील, पाणी पुरवठा सभापतीश्री दिपक सुर्वे आरोग्य सभापती श्री संजय केंगार, शिक्षण सभापती श्री मनोज साळुंखे,मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापती संध्या बनसोडे तसेच पक्षप्रतोद, सर्व नगरसेवक,नगरसेविका व मुख्य अधिकारी श्री संतोष खांडेकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a comment

0 Comments