पुण्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्पती पदक देऊन गौरविण्यात येणार..



 पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची आज घोषणा झाली. महाराष्ट्रातील ५७ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके, १३ पोलीस शौर्य पदके व प्रशंसनीय सेवेकरिता ४० पोलिस पदके जाहीर झाली आहेत.

पुण्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांना प्रशंसनीय सेवेबद्दल हे पदक मिळाले आहे. पुण्यात कोरोना लाॅकडाऊनच्या काळातील परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यात शिसवे यांचा मोठा वाटा होता. गेले दीड वर्षे ते पुण्याचे सहपोलिस आयुक्त आहेत. त्यांची मे २०१९ मध्ये सहपोलिस आयुक्त म्हणून पद्दोन्नत्ती झाली होती. शिसवे हे २००२ च्या बॅचचे त्यांना २००८ साली अंतरिक्ष सुरक्षा सेवा पदक आणि हार्डशीप स्पेशल सव्हस पदक मिळाले आहे. आत्तापर्यंतच्या सेवाकाळात त्यांना ५५ बक्षिसांनी गौरविण्यात आले आहे. सेवा करीत असताना अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामाना करण्यासाठी आवश्‍यक असलेली अद्ययावत कौशल्य मिळवण्यासाठी शिसवे यांनी आत्तापर्यंत तीन वेळा परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.

पुण्यात येण्याआधी मध्य मुंबई, मुंबई गुन्हे शाखा येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त पण जबाबदारी सांभाळली होती. मुंबईतील महत्वाच्या मानल्या गेलेल्या परिमंडळ एकचे उपायुक्त त्यांनी काम पाहिले. या पदावर सर्वाधिक काळ काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे. सिंधुदुर्ग बुलढाणा, सांगली या जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. गोंदिया, गडचिरोली येथेही त्यांनी सुरवातीच्या काळात त्यांनी काम पाहिले होते. कर्तव्यकठोर आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख आहे. प्रचंड वाचन असणारे शिसवे हे पोलिस दलातील दुर्मिळ अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.

पदकप्राप्त पोलिसांची नावे खालीलप्रमाणे:

१. प्रभात कुमार,अतिरिक्त पोलिस महासंचालक, वरळी, मुंबई
२. डॉ. सुखविंदर सिंग,अतिरिक्त पोलिस महासंचालक फोर्स-१,मुंबई
३. निवृत्ती तुकाराम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे
४. विलास बाळकु गंगावणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शाहु नगर पोलिस ठाणे माहिम (पूर्व ), मुंबई

शौर्यपदक विजेते
१. राजा आर. अतिरिक्त पोलीस अधीक्षक.
२.नागनाथ गुरुसिध्द पाटील, पोलिस उपनिरीक्षक.
३. महादेव मारोती मडावी, हवालदार.
४. कमलेश अशोक अर्का, नाईक पोलिस हवालदार.
५. हेमंत कोरके मडावी, पोलिस हवालदार.
६. अमुल श्रीराम जगताप, पोलिस हवालदार.
७. वेल्ला कोरके आत्राम, पोलिस हवालदार.
८.सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलिस हवालदार.
९. बियेश्वर विष्णू गेडाम, पोलिस हवालदार.
१०. गजानन दत्तात्रय पवार, पोलिस निरीक्षक.
११. एन. हरी बालाजी, सहाय्यक पोलीस अधीक्षक.
१२. गिरीश मारूती ढेकळे, नाईक पोलीस हवालदार.
१३. निलेश मारूती धुमणे, नाईक पोलीस हवालदार.

पोलिस पदक विजेते ः
१. रवींद्र अनंत शिसवे, पोलीस सहआयुक्त, पुणे.
२. प्रवीणकुमार चुडामण पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई.
३.वसंत उत्तमराव जाधव,पोलिस अधीक्षक, भंडारा.
४. कल्पना यशवंत गाडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक (सायबर) मुंबई.
५. संगीता लिओनेल शिंदे-अल्फोन्सो, पोलीस उपअधीक्षक, ठाणे .
६. दिनकर नामदेव मोहिते, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई.
७. मेघश्‍याम दादा डांगे, पोलीस निरीक्षक, नंदुरबार.
८. मिंलिद देसाई, पोलीस निरीक्षक, औरंगाबाद.
९. विजय चिंतामण डोळस, पोलीस निरीक्षक, ठाणे.
१०.रविंद्र रघुनाथ दौंडकर, पोलीस निरीक्षक, नवी मुंबई.
११. तानाजी दिगंबर सावंत, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर.
१२. मनीष मधुकर ठाकरे, पोलीस निरीक्षक,अमरावती.
१३. राजू भागोजी बिडकर, पोलीस निरीक्षक, मुंबई.
१४. अजय रामदास जोशी, पोलीस निरीक्षक, मुंबई.
१५. प्रमोद भाऊ सावंत, पोलीस निरीक्षक, मुंबई.
१६. भगवान मारीबा धाबडगे, पोलीस निरीक्षक, नांदेड.
१७. रमेश मुगतराव कदम, पोलीस उपनिरीक्षक, ठाणे शहर.
१८. राजेश बाबुलाल नगरुरकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक, बुलढाणा.
१९. सूर्यकांत क्रिष्णा बोलाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई.
२०. लीलेश्वर गजानन व-हाडमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर.
२१. भारत नाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सातारा.
२२. हेमंत नागेश राणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई.
२३. रामदास बाजीराव गाडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, औरंगाबाद.
२४. हेमंत काशीनाथ पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,रायगड.
२५. अशोक कमलावर मंगलेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती.
२६. जीवन हिंदुराव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई.
२७. राजेंद्र रमाकांत मांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रायगड.
२८. विजय नामदेवराव बोरीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर.
२९. पुरुषोत्तम शेषरावजी बरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अमरावती.
३०. उदयकुमार रघुनाथ पलांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ठाणे.
३१. थॉमस कार्लोस डिसोझा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ठाणे.
३२. प्रकाश बाबुराव चौघुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई.
३३. सुरेश शिवराम मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ठाणे.
३४. संजय साटम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सिंधुदुर्ग.
३५. शाकिर गौसमोहीदिन जिनेदी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी चिंचवड.
३६. संजय रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई.
३७. शरदप्रसाद रमाकांत मिश्रा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर.
३८. प्रकाश ज्ञानेश्वर अंडील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जालना
३९. जयराम धनवाई, गुप्तचर अधिकारी, औरंगाबाद.

४०. राजू इरपा उसेंडी, गुप्तचर अधिकारी, गडचिरोली. 

Post a Comment

Previous Post Next Post