सिंहगड पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या



 पुणे - सिंहगड पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. साबीर इस्लामउददील अलम (19, रा. अमन चव्हाण आळी, धायरी रोड नऱ्हे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार तपास पथकातील कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस हवालदार आबा उत्तेकर यांना खबर मिळाली की, ब्रम्हा हॉटेल चौकात आरोपी चोरीची दुचाकी घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे चौकात सापळा रचून साबीरला संशयास्परित्या दुचाकीवरुन जाताना ताब्यात घेण्यात आले.त्याच्या दुचाकीच्या नंबरप्लेटवरुन तपास केला असता, ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिशी खाक्‍या दाखवताच त्याने सिंहगड रस्ता व कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण पाच दुचाकी त्याच्याकडून चोरीच्या दीड लाखाच्या दुचाक्‍या हस्तगत करण्यात आल्या.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार, उजवल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगेपाटील,धनाजी धोत्रे, अविनाश कोंडे, निलेश कुलये, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांचे पथकाने केली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post