कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृह येथे जिल्हा नियोजनाची बैठक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली


कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृह येथे जिल्हा नियोजनाची बैठक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी *आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब* यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे ....


▪️ इचलकरंजी आयजीएम रुग्णालय 400 बेडचे करून आणखी एक मजला वाढवण्यात यावा.
▪️ आयजीएम रुग्णालयामध्ये मेडिकल कॉलेज सुरू करावे.
▪️ महाराष्ट्र शासनाने कोरोना सारख्या भयंकर महामारीमध्ये आपल्या जीवाची परवा न करता कोरोनाग्रस्तांची सेवा केलेल्या योद्ध्यांना भरतीसाठी प्राधान्य द्यावे.
▪️इचलकरंजी येथे अद्ययावत पोलीस क्वार्टर करावे.
▪️इचलकरंजीला जिल्हा नियोजनातून जास्त निधी मिळावा  
▪️ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महावितरण कंपनीचे सबस्टेशन व लाईटच्या खांबांचा घरफाळा महावितरण कंपनीने  भरावा किंवा ग्रामपंचायत फाळ्यातून वर्ग करून घ्यावा. तसेच विजेचे नवीन खांब उभारण्यासाठी  महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीला परवानगी द्यावी.

Post a comment

0 Comments