_जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या खोट्या गुन्ह्यात अटक केलेल्या हिमायत बेग यांच्या वडिलांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .



पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या खोट्या गुन्ह्यात अटक केलेल्या हिमायत बेग यांच्या वडिलांचे  आज हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले .

एक दिवस हिमायत बेग जरूर तुरुंगातून निर्दोष सुटून बाहेर येणार माझा मुलगा निरपराध आहे.बाहेर आल्या नंतर मी स्वतः त्याचा हाथ धरून त्याला सोबत घेऊन बीडच्या गल्लीगल्लीत जाऊन लोकांना दाखविण्याचे  काम करेल त्याशिवाय मला मरण येणार नाही. या आधी  जर मला मरण आले  तरी मला शांती मिळणार नाही.असे सतत पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांच्याशी बोलणाऱ्या हिमायत बेग यांचे वडिल इनायत बेग यांचे डोळे शेवटी अनंत काळासाठी मिटले.*_

 _13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्यातील   जर्मन  बेकरी येथे बॉम्बस्फोट झाला. 17 लोक मृत्युमुखी पडले तर अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले. तपास एजन्सीने शोध घेण्याचे काम सुरू केले प्रथम समद भटकल या तरुणाला अटक केली.ज्या दिवशी पुणे येथे जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला त्याच दिवशी समद भटकल हा तरुण आपल्या कुटुंबास सोबत एका लग्न समारंभ मध्ये जेवण वाटायचं काम करीत होता.असे व्हिडिओ न्यायालयासमोर पुढे केल्याने समद भटकल याची माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तपास एजन्सीच्या खोट्या कारवाईवर अनेक लोक बोलू लागले यात मोठी नाचक्की तपास एजन्सीची झाली होती._

_बॉम्बस्फोटाच्या खऱ्या सूत्रधारा कडे जाणून-बुजून दुर्लक्ष करून पुन्हा बीड येथे राहणारे एका तरुण मुलाला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार या नात्याने अटक केली.अनेक बनवा बनवी करीत पत्रकार परिषद घेऊन दाखविले की जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार हिमायत बेग याला अटक केली आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा तिढा सुटला आहे. पुण्यात तर काही ब्राह्मण्यवादी संघटनांनी हिमायत बेगला अटक केल्यावर पेढ्याचे वाटप केले. *मीडियात प्रसिद्धी मिळविण्यासाठी पुणे बार कौन्सिलचे श्री मिलिंद  पवार यांनी वकिलांना विश्‍वासात न घेता परस्पर घोषित केले की हिमायत बेग यांचे केस पुण्या तील वकील लढणार नाही. प्रचंड तणाव असताना पुणे येथील ज्येष्ठ वकील एडव्होकेट.ए. रेहमान व एडव्होकेट.कायनात शेख यांनी हिमायत बेग यांचे केस लढण्याचे धाडस दाखविले.*_

_प्रचंड दबाव कोर्टावर यावा याकरिता अनेक स्टंट कोर्टाच्या आवारात सुरू होते.....असो._

_पुणे सेशन कोर्टात ट्रायल सुरू झाले माननीय न्यायालयाने हिमायत बेग याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली निकाल ऐकल्यानंतर हिमायत बेग बेशुद्ध झाला. हिमायत बेगच्या वडिलांनी निर्णय घेतला  की उच्च न्यायालयात दाद मागणार.मुंबई उच्च न्यायालयात हिमायत बेगला दिलासा मिळाला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटतून त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले व फाशीची शिक्षा रद्द करून त्याला इतर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली._

_मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाल विरोधात हिमायत बेग याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.व सध्या तो  नाशिकच्या तुरुंगात बंदी आहे. याच दरम्यान पुणे व नागपुर येथे तुरूंगात गुंडांकडून हिमायत बेगला ठार मारण्याचा प्रयत्नही झाले. आजही एक निरपराध आपल्या सुटकेसाठी तुरुंगात राहून संघर्ष करीत आहे._हिमायत बेग यांचे वडिलांना खूप अपेक्षा होती की मी जिवंत असतानाच माझा मुलगा बाहेर आला पाहिजे. कदाचित ते त्यांच्या नशिबात नाही.

मा.अंजुम इनामदार पुणे_

9028402814

Post a Comment

Previous Post Next Post